मराठी म्हणी

कोल्हा काकडीला राजी - लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
गाढवाला गुळाची चव काय - अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
घोडामैदानजवळ असणे - परीक्षा लवकरच होणे
डोंगर पोखरून उंदीर कढणे - जास्त श्रम करून कमी फायदा होणे

भरंवशाच्या म्हशीला टोणगा - पूर्ण निराशा करणे
वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
पाण्यात राहून माशाशी वॆर - बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
खायला काळ भुईला भार - ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले - दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी पण कृती छोटी